प्रगती आणि समृद्धीची वाटचाल
घाणेखुंट हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य व सांस्कृतिक गाव आहे. हिरवाईने नटलेली शिवारं, स्वच्छ हवा आणि प्रेमळ माणसं हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. गावातील सर्व विकासकामे ग्रामपंचायतीमार्फत पारदर्शक पद्धतीने केली जातात. गावाच्या अर्थकारणात शेती, लघुउद्योग आणि रोजगार हमी योजनांचा मोठा वाटा आहे. शिक्षण, पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व ग्रामविकास या क्षेत्रांत घाणेखुंट ग्रामपंचायत सातत्याने प्रगती करत आहे. लोकसंख्या, घरसंख्या, साक्षरता, प्रशासन, शेजारील गावं, संपर्क सुविधा यासंबंधीची सर्व माहिती नागरिकांसाठी सहज उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिकता आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क कराशाश्वत विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि सर्वसमावेशक प्रगती यांचा बळावर आधुनिक आणि समृद्ध पाली निर्माण करणे.
प्रत्येक कुटुंबापर्यंत सुविधा, प्रत्येक हाताला काम, आणि प्रत्येक मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.